Special Report | शिर्डीतलं दान मुस्लिमांच्या झोळीत? व्हायरल व्हिडीओचा दावा खरा की खोटा?
VIDEO | शिर्डीतील साईबाबा संस्थानचा पैसा मशिदीसाठी वापरला? व्हिडीओतला दावा खरा की खोटा? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : शिर्डीमधील साई बाबांच्या चरणी येणारं दान हे मुस्लिमांना दिलं जातंय असा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. मात्र या व्हिडीओमध्ये किती सत्यता आहे. व्हायरल व्हिडीओचा दावा खरा की खोटा? या व्हायरल व्हिडीओमध्ये एका धार्मिक स्थळात दान जमा होतंय. दान रूपाने मिळालेले पैसे पोत्यात भरले जातायंत. तेच पोते नंतर दुसरीकडे नेले जाताय. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर करत एक दावा केलाय की, जमा झालेलं हे दान शिर्डीच्या साई मंदिरातील आहे आणि दानातील सारा पैसा गैरहिंदूंना दिला जातोय. मनी नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. आणि म्हटलंय शिर्डी संस्थानात येणारं दान कुठं जातंय तुम्ही बघा…पण खरंच शिर्डीतील दान कुणाला दिलं जातंय का? याची सत्यता पडताळली असता हा दावा खोटा निघाला. तर साईबाबा संस्थानने असा कुठलाही निधी दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच तशाप्रकारे निधी देण्याची तरतूदच नसल्याचं साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी म्हंटलंय. संस्थानकडे जमा होणारी दानाची रक्कम विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केली जाते. या निधीचा विनियोग करताना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते, असे देखील तांबे यांनी स्पष्ट केलंय.