फलटणच्या राजवाड्यासमोर पालखीचं जंगी स्वागत! नाईक निंबाळकर घराण्यानं केलं स्वागत

फलटणच्या राजवाड्यासमोर पालखीचं जंगी स्वागत! नाईक निंबाळकर घराण्यानं केलं स्वागत

| Updated on: Jul 02, 2022 | 11:22 AM

विमानतळ असणाऱ्या ठिकाणी पालखीचा मुक्काम होणार आहे.गेल्या दोन वर्षांत सोहळा न झाल्याने फलटणवासीयांना माऊलीच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली होती.

फलटण: टाळ मृदूंगाच्या नादात वैष्णवांची वारी पंढरपूरच्या (Pandhapur wari 2022) दिशेने पाऊलं टाकत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा (Dnyaneshwar maharaj palkhi) आज फलटण येथे मुक्कामी आहे. फलटण (Phaltan) येथे माऊलीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. नाईक निंबाळकर घराण्यानं पालखीचं स्वागत केलंय. फलटणच्या राजवाड्यासमोर स्वागत करण्यात आलंय. विमानतळ असणाऱ्या ठिकाणी पालखीचा मुक्काम होणार आहे.गेल्या दोन वर्षांत सोहळा न झाल्याने फलटणवासीयांना माऊलीच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली होती. स्थानिकांनी रांगेत पालखीचे दर्शन घेतले. तरडगाव येथील प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील गावोगावचे स्वागत स्वीकारून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्‍तांसोबत संध्याकाळी चारला जिंती नाक्यावर फलटण शहरात दाखल झाला. येथे नागरिकांनी गर्दी केली होती.

Published on: Jul 02, 2022 11:22 AM