Shiv Temple | एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 1 हजार 111 महादेवाच्या पिंडी; कुठं आहे नेमकं हे मंदिर?
VIDEO | शिव शंकराचं एक अदभुत आणि विलोभनीय मंदिर तुम्ही पाहिलं का? जिथे एक दोन नव्हे तर तब्बल 1 हजार 111 महादेवाच्या पिंडींचं तुम्हाला दर्शन घेता येईल, तर मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराच्यावर कळस नाहीतर 25 फुटाची आहे महादेवाची पिंड
पुणे, पिंपरी-चिंचवड, २९ ऑगस्ट २०२३ | औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात शिव शंकराचं एक अदभुत आणि विलोभनीय मंदिर बनवण्यात आले आहे. जिथे एक दोन नव्हे तर तब्बल 1 हजार 111 महादेवाच्या पिंड साकारण्यात आल्या आहेत , इतकेच नाही तर , या तीन मजली मंदिराच्या वर कळस बसवण्याऐवजी 25 फुटांची भव्य पिंड बनविण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड मधील चिखली जाधव वाडी येथील हे कैलास सरोवर मंदिर आहे. जिथे 1 हजार 111 महादेवाच्या पिंड आहेत. त्याचबरोबर इथे मंदिराच्या मुख्यद्वारावरच भगवान शिव शंकराची मोठी मूर्ती आहे तर दुसरीकडे मंदिराच्या समोर नंदीजी आणि पिंडाची मोठी भव्य मूर्ती आहे. श्रावण महिन्यात आणि अन्य दिवशी या मंदिरांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराच्यावर असलेली 25 फुटाची महादेवाची पिंड..आणि हीच पिंड भाविकांचं लक्ष वेधून घेते.