तिसरा प्रकल्पही हातातून जाण्याच्या मार्गावर; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

तिसरा प्रकल्पही हातातून जाण्याच्या मार्गावर; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

| Updated on: Sep 16, 2022 | 5:20 PM

गणेश मिरवणुकीत गद्दारांकडून बंदूक काढली जाते. हेच यांचं हिंदुत्व आहे का? गणेश विसर्जन करताना अशीच मूर्ती फेकून देणं हे त्यांचं हिंदुत्व आहे का? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई: वेदांता प्रकल्पारवरून (vedanta project) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील 1 लाख 70 हजार रोजगार निर्माण करणारे प्रकल्प निघून गेले आहेत. आतापर्यंत दोन प्रकल्प हातातून निघून गेले आहेत. तिसरा प्रकल्पही जाण्याच्या मार्गावर आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. नवी मुंबईत बालाजी मंदिर करू इच्छित होतो. पण त्यावर या सरकारने स्थगिती दिली. 10 पुरातन मंदिरांना 100 वर्ष पूर्ण झाली. त्याचा जीर्णोद्धार करण्यात येणार होता. त्याला स्थगिती देण्यात आली आहे. पर्यटन खात्याने मंदिरांना फंड दिला. त्यालाही या सरकारने स्थगिती दिली. गणेश मिरवणुकीत गद्दारांकडून बंदूक काढली जाते. हेच यांचं हिंदुत्व आहे का? गणेश विसर्जन करताना अशीच मूर्ती फेकून देणं हे त्यांचं हिंदुत्व (hindu) आहे का? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे मीडियाशी संवाद साधत होते.

Published on: Sep 16, 2022 05:19 PM