Mohit Kamboj : मोहित कंबोजच्या ट्विटवरुन राजकारण, ही लोकशाही, ठोकशाही नसल्याचे आदित्य ठाकरेंचे वक्तव्य
देशात लोकशाही आहे ठोकशाही असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी फटकारले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून त्यांचे ट्विटचे समर्थन केले जात आहे. त्यांच्या ट्विटमध्ये सत्य असेल तर चौकशी होणे तेवढेच गरजेचे असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पोलीस यंत्रणेला देतील आणि योग्य ती चौकशी करतील असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
मुंबई : “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. असे ट्विट हे मोहित कंबोज यांनी केले होते. त्यांचा निशाणा हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. मात्र, त्यांच्या या ट्विटवरुन राजकारण पेटले आहे. विरोधकांकडून त्यांच्या ट्विटबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. देशात लोकशाही आहे ठोकशाही असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी फटकारले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून त्यांचे ट्विटचे समर्थन केले जात आहे. त्यांच्या ट्विटमध्ये सत्य असेल तर चौकशी होणे तेवढेच गरजेचे असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पोलीस यंत्रणेला देतील आणि योग्य ती चौकशी करतील असेही बावनकुळे म्हणाले आहेत.