Aaditya Thackeray : खोके सरकारचं मॅग्नेट स्वतःसाठी खोके खेचतंय, आदित्य ठाकरे यांचा व्हायब्रंट गुजरातवरून टोला

Aaditya Thackeray : खोके सरकारचं मॅग्नेट स्वतःसाठी खोके खेचतंय, आदित्य ठाकरे यांचा व्हायब्रंट गुजरातवरून टोला

| Updated on: Oct 11, 2023 | 6:55 PM

VIDEO | आदित्य ठाकरे यांचा टि्वट करत 'व्हायब्रंट गुजरात'वर जोरदार निशाणा, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एयरबस-टाटा, ४० गद्दार, सगळंच तर पाठवलं तिथे अजून काय पाहिजे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला तर गुजरातला पाठवतात रोजगार आणि मिंधे सरकार रोज गार अशी खोचक टीकाही केली

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत ह्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलाय. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ‘व्हायब्रंट गुजरात’वर जोरदार हल्लाबोल केलाय. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एयरबस-टाटा, ४० गद्दार…. सगळंच तर पाठवलं तिथे… अजून काय पाहिजे? असा सवाल करत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम मात्र होऊ नाही शकला, कारण ह्या खोके सरकारचं मॅग्नेट स्वतःसाठी खोके खेचतंय आणि उद्योग-रोजगार तिथे पाठवतंय, आदित्य ठाकरे यांनी खोचक टोलाही लगावला आहे. तर गुजरातला पाठवतात रोजगार आणि मिंधे सरकार रोज गार, असे भाष्य करत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारला डिवचलं आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देत असं म्हटलं की, आदित्य ठाकरे यांनी टोमणं मारणं बंद करावं, टोमणं मारल्याने त्यांची वाढ खुंटते.

Published on: Oct 11, 2023 06:54 PM