संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा, काय आहे कारण?
VIDEO | संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार भगवा मोर्चा, काय आहे कारण?
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ तसेच लव्ह जिहाद, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा भगवा आक्रोश मोर्चा आज मोठ्या संख्येने काढण्यात येणार आहे. तर संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर हा भगवा मोर्चा धडकणार आहे. एकीकडे शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असताना सकल हिंदू समाजाचा संगमनेरमध्ये भगवा मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर , अकोले , राहाता तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. तर 60 गावांसह व्यापारी वर्गाचाही या मोर्चाला पाठींबा असल्याचे सांगितले जात आहे. संगमनेर शहरातील वाढती गुन्हेगारी , टोळीयुद्ध , हिंदू समाजावर होणारे अन्याय – अत्याचार या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.