पंजाबमधील मोठ्या विजयानंतर अरविंद केजरीवाल पुन्हा त्याच हनुमान मंदिरात

पंजाबमधील मोठ्या विजयानंतर अरविंद केजरीवाल पुन्हा त्याच हनुमान मंदिरात

| Updated on: Mar 10, 2022 | 5:20 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये बंपर विजय मिळाला आहे. पंजाबमध्ये (Punjab Assembly Election 2022) आपचे 92 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये आपचीच सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विजयामुळे आम आदमी पार्टीला (AAP) बंपर लॉटरीच लागली आहे. या विजयानंतर अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी […]

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये बंपर विजय मिळाला आहे. पंजाबमध्ये (Punjab Assembly Election 2022) आपचे 92 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये आपचीच सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विजयामुळे आम आदमी पार्टीला (AAP) बंपर लॉटरीच लागली आहे. या विजयानंतर अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी सत्येंद्र जैन यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात प्रार्थना केली. पंजाबमधील मोठ्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आज बाबासाहेब आंबेडरकर आणि शहीद भगतसिंग यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलंय.

Published on: Mar 10, 2022 05:20 PM