मनीष सिसोदिया यांना अटक; आम आदमी पार्टीकडून ठिकठिकाणी आंदोलनं
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक झाली आहे. याविरोधात आम आदमी पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत.
ठाणे : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना झालेल्या अटकेच्या विरोधात आम आदमी पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्यातील आम आदमी पार्टीचे नेते अमर आमटे यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. जोरदार घोषणा बाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सिसोदिया यांच्यावरील कारवाई चुकीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. भाजपचा पाठिंबा असलेले अदानी आणि महाराष्ट्रतील भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यावर देखील घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.