आपच्या 4 नेत्यांना अटक करण्याचं भाजपचं षडयंत्र, कुणी केला खळबळजनक दावा?

आपच्या 4 नेत्यांना अटक करण्याचं भाजपचं षडयंत्र, कुणी केला खळबळजनक दावा?

| Updated on: Apr 02, 2024 | 3:05 PM

निवडणुका संपण्यापूर्वी आपच्या आणखी चार नेत्यांना अटक होऊ शकते, असा मोठा गौप्यस्फोटही अतिशी यांनी केला आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या, मी भाजपच्या कोणत्याही दबावाला घाबरणार नाही. भाजपने माझ्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने मला भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर दिली. एकतर भाजपमध्ये सहभागी व्हा अन्यथा....

मला भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा दावा दिल्ली सरकारमधील आपच्या मंत्री अतिशी यांनी केला आहे. निवडणुका संपण्यापूर्वी आपच्या आणखी चार नेत्यांना अटक होऊ शकते, असा मोठा गौप्यस्फोटही अतिशी यांनी केला आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या, मी भाजपच्या कोणत्याही दबावाला घाबरणार नाही. भाजपने माझ्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने मला भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर दिली. एकतर भाजपमध्ये सहभागी होऊन राजकीय करीअर वाचवा नाहीतर येणाऱ्या एका महिन्यात ईडीद्वारे मला अटक होईल, असा खळबळजनक गौप्यस्फोटही त्यांनी केला. माझ्यासह आणखी तीन नेत्यांना अटक केली जाऊ शकते, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्डा यांना भाजप कडून अटक करण्याचं षडयंत्र असल्याचा मोठा दावाही अतिशी यांनी केला.

Published on: Apr 02, 2024 03:05 PM