दिल्लीत केजरीवाल जिंकणार? दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची आप ही निवडणूक जिंकू शकते, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार असून ५ फेब्रुवारीला हे मतदान होणार आहे. तर निवडणुकीच्या मतांची मतमोजणी म्हणजेच निवडणुकीचा निकाल ८ तारखेला जाहीर होणार आहे. अशातच दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची आप ही निवडणूक जिंकू शकते, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. काँग्रेस आणि आप एकत्र अशते तर चांगलं झालं असतं, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ‘काँग्रेस आणि आप एकत्र असते, तर चांगलं झालं असतं, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-आपची आघाडी होताना दिसत नाहीय’, असं दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. “दिल्ली विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. अरविंद केजरीवाल ही निवडणूक जिंकू शकतात. काँग्रेसही शर्यतीत आहे. पण इथे बसून मला दिल्लीबद्दल जास्त काही बोलता येणार नाही” असं त्यांनी सांगितलं.