वाखरी पालखी तळावर मानाच्या पालख्या दाखल होण्यास सुरुवात, पंढरपूरकडे रवाना होणार

वाखरी पालखी तळावर मानाच्या पालख्या दाखल होण्यास सुरुवात, पंढरपूरकडे रवाना होणार

| Updated on: Jul 19, 2021 | 5:55 PM

आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये वाखरीला महत्वाचं स्थान आहे. वाखरी पालखीतळावर मानाच्या सर्व पालख्या एकत्र येतात. मानाचे वारकरी पालख्या घेऊन पालखी तळावर दाखल होत आहेत.

पंढरपूर: आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये वाखरीला महत्वाचं स्थान आहे. वाखरी पालखीतळावर मानाच्या सर्व पालख्या एकत्र येतात. मानाचे वारकरी पालख्या घेऊन पालखी तळावर दाखल होत आहेत. एकनाथ महाराजांची पालखी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झाल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल झाली. त्यानंतर कौंडण्यपूर येथी रखुमाईची पालखी, पैठणहून संत एकनाथ महाराज यांची पालखी वाखरीत दाखल झाली आहे.मानाच्या दहा पालख्या एकाच वेळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. दहा मानाच्या पालखी सोहळ्यातील 400 वारकरी पंढरपूरला जातील. वाखरीपासून पुढे तीन किलोमीटर दहा दहाच्या गटांनी वारकरी यांना सोडलं जाणार आहे. आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.