वारीत हिंदू-मुस्लिम ऐक्याच दर्शन, अब्दुल चाचा करतायत वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा!

वारीत हिंदू-मुस्लिम ऐक्याच दर्शन, अब्दुल चाचा करतायत वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा!

| Updated on: Jun 14, 2023 | 11:56 AM

VIDEO | सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अब्दुल चाचा करतायत वारकऱ्यांची सेवा, बघा व्हिडीओ

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. त्याच बरोबर लाखो वारकरी ही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जणं करत असतात. जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करतात. मात्र मुळचे पुण्याचे असणारे सध्या हैद्राबाद येथे स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात असं त्यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. अब्दुल रजा आहे मूळ हैदराबादला राहायला गेले. तरीही दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्याला साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात. अनेक वारकरी त्यांचे सेवा घेण्यासाठी न चुकता येत असतात. तर या सेवेबाबत अब्दुल रजा म्हणतात की, वारकऱ्यांची सेवा करून मला आनंद मिळतो.

Published on: Jun 14, 2023 11:54 AM