“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून…” सत्तारांचा दानवेंवर निशाणा, नवा वाद होणार?
“एक का कल्याण करता दिल्ली को भेजता, दुसरे का बिस्मिल्ला करता भोकरदन मे बिठाता” असे वादग्रस्त वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात त्यांनी केलेल्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड, बीड आणि जालना जिल्ह्यात भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहताना दिसतंय. अशातच सर्वच राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी कंबर कसली असताना अब्दुल सत्तार यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. “एक का कल्याण करता दिल्ली को भेजता, दुसरे का बिस्मिल्ला करता भोकरदन मे बिठाता” असे वादग्रस्त वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. म्हणजेच एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर एकाचं बिस्मिल्ला करून भोकरदनला पाठवलं, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. जालना लोकसभेत रावसाहेब दावने यांचा पराभव झाला होता. तर कल्याण काळे यांचा विजय झाला होता. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसणार अशी चर्चा सुरू आहे.