रमेश चेंडगे, हिंगोलीः कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधताना आज नवाच शब्द वापरला. आदित्य ठाकरे यांना त्यांनी पप्पू (Pappu) या नावाने संबोधलं. एकदा-दोनदा नाही तर तीनदा ठरवून असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात सत्तारांची वक्तव्य वारंवार चर्चिली जात आहेत.
अब्दुल सत्तार आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. यावेळी भाषणांदरम्यान त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. मात्र आदित्य ठाकरे यांनीदेखील प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी पप्पू, टप्पू कीहीही म्हणू देत. शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे, एवढी अपेक्षा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
अब्दुल सत्तार म्हणाले, ‘ सप्टेंबरला त्यांचे वडील मुख्यमंत्री होते आणि हे कॅबिनेट मंत्री होते. ही देवाण-घेवाण बरोबर झाली नाही, म्हणून प्रकल्प गेला.. छोटा पप्पब जे बोलतोय ते पहिले बोलले असते तर आजही परिस्थिती झाली नसती.
आजचं सरकार जे तत्परतेने काम करतंय, तसं कुणीही करत नाही. छोटा पप्पू काय बोलतो ते त्याचं काम आहे. जे जे पप्पू बोलले त्यांची जागा काय होती हे सर्वांना माहीत आहे…
‘ पप्पू क्रमांक दोन तेच ना त्यांच्याबद्दल हेच बोललो. ज्यावेळी ते गोधडीत होते, त्यावेळी मी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून काम करत होतो. याची जाणीव त्यांना नाही. जाणीव असताना त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. ते मंत्री होते. अडीच वर्षात काय केलं त्याचं मूल्यमापन करा…’
‘एक पप्पू क्रमांक दोन आता मार्केट मध्ये आले. पप्पू क्रमांक दोन पत्रकारांना समजलं असेल. तुम्हाला समजलं नसेल. तेही फिरायला लागले. अडीच वर्ष घराच्या बाहेर निघाले नाही. आमच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. अडीच तासाचा कार्यक्रम केला. शेतकऱ्यांशी 24 मिनिटांची चर्चा केली.’