‘२०२४ मध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार’, ‘या’ शिवसेनेच्या नेत्यानं केला मोठा दावा
VIDEO | तीन राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय, त्यामुळे २०२४ ची नांदी असल्याचे कुणी दिले सूचक संकेत?
अमरावती : तीन राज्यातील झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे 2024 ची नांदी असल्याचे सूचक संकेत शिवसेना नेते आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला असला तरी त्याचे चिंतन आणि मंथन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत मतदारसंघात झालेल्या पराभवावर दिली आहे. तर कसबा पोटनिवड़णुकीतील पराभवाचे कारण शोधले जाईल. तसेच पुढं भविष्यामध्येही असं होणार नाही याबाबत योग्य दिशा ठरवली जाईल तसेच योग्य उपाययोजना करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले आहे. 2024 मध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया देत अब्दुल सत्तार यांनी दावा केला आहे. बघा काय म्हणाले अब्दुल सत्तार…
Published on: Mar 04, 2023 08:03 PM
Latest Videos