बबनदादा शिंदे यांना थेट आव्हान, माढ्यात शरद पवार नवा भिडू उतरवणार?

बबनदादा शिंदे यांना थेट आव्हान, माढ्यात शरद पवार नवा भिडू उतरवणार?

| Updated on: Nov 17, 2023 | 11:28 AM

राष्ट्रवादीत अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली आणि राष्ट्रवादीची शकलं उडाली. आता उरल्या सुरल्या साथीदारांना सोबत घेत नवं नेतृत्व तयार करत शरद पवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत. बबनदादा शिंदे यांच्या रूपात शरद पवार यांचा अजित पवार यांनाच शह देण्याचा प्रयत्न?

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ : माढ्यावर शरद पवार यांचं विशेष प्रेम आहे. आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित गटात प्रवेश केल्यानंतर पवारांनी आपला भिडू उतरवण्याचं निश्चित केलंय. त्यासाठी शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पवार नवख्या अभिजित पाटील यांना उतरवणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादीत अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली आणि राष्ट्रवादीची शकलं उडाली. आता उरल्या सुरल्या साथीदारांना सोबत घेत नवं नेतृत्व तयार करत शरद पवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत. माढा लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी पुन्हा कंबर कसलीये. शरद पवार गटाकडून अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जातेय. त्यामुळे बबनदादा शिंदे यांच्या रूपात शरद पवार यांचा अजित पवार यांनाच शह देणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Nov 17, 2023 11:28 AM