Abu Azmi | राज्यातील सरकार पाडण्यासाठी 'हा' कट रचल्याचा माझा संशय - अबू आझमी

Abu Azmi | राज्यातील सरकार पाडण्यासाठी ‘हा’ कट रचल्याचा माझा संशय – अबू आझमी

| Updated on: Nov 18, 2021 | 8:02 PM

: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर गंभीर टीका केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील हिंसाचार आणि दंगलीवरदेखील भाष्य केलंय. मालेगावमध्ये रॅली काढली जात होती, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. तेव्हा एकाने पोलिसांवर हल्ला केला. त्याचा आम्ही निषेध करतो, असे आझमी म्हणाले.

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर गंभीर टीका केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील हिंसाचार आणि दंगलीवरदेखील भाष्य केलंय. मालेगावमध्ये रॅली काढली जात होती, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. तेव्हा एकाने पोलिसांवर हल्ला केला. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यावर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील सरकार पाडण्यासाठी हा कट असावा, असा माझा संशय आहे. धर्म आणि एखाद्या व्यक्तीबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्याला तुरुंगात टाकायला हवं.  आम्हीं पोलिसांच्या कामाच कोतुक केलं. पण, आता भाजप आणि RSS चा दबाव वाढत आहे. काही मुस्लिम बांधवांनी मंदिराला संरक्षण दिलं. कंगणाला अजून अटक झाली नाही याचे मला आचार्य आहे.  कंगनाचा पद्मश्री परत घेण्यात यावा, असे आझमी म्हणाले.