लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याच्या घरातून ACB च्या हाती लागलं मोठं घबाड, काय आहे प्रकरण?
VIDEO | लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या निवासस्थानी ACB कारवाई, नेमकं प्रकरण काय?
नाशिक : लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या निवासस्थानी एसीबीने कारवाई केली आहे. पन्नास हजारांची लाच घेताना एसीबीने सुनीता धनगर यांना रंगेहात अटक केली होती. याच प्रकरणात सुनीता धनगर यांच्या घरातून एसीबीला मोठं घबाड मिळाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, वादग्रस्त महापालिका प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५५ हजारांची लाच घेताना एसीबी म्हणजेच लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, तक्रारदार मुख्यध्यापकास शैक्षणिक संस्थेने रूजू करून घेण्यासाठी त्या संस्थेला पत्र देण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे महापालिका शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्याचे चित्र समोर आले आहे. या दोन्ही लाच घेणाऱ्यांवर सरकारवाडा पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.