ठाकरे गटाचे माजी नगरसेवकाच्या घरी ACB ची धाड, अडचणीत होणार वाढ?
VIDEO | ठाकरे गटाचे माजी नगरसेवकाच्या विरोधात ACB कडून गुन्हा दाखल, छापेमारीसाठी टीम घरी दाखल
मुंबई : ठाकरे गटाचे नेते योगेश भोईर यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे योगेश भोईर यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. योगेश भोईर यांच्या घरी एसीबीची टीम छापेमारीसाठी पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. योगेश भोईर हे माजी नगरसेवक आहेत. भोईर यांनी 85 लाख रुपयांपेक्षा जास्तची मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून याप्रकरणी सध्या भोईर यांच्या घरी छापा सुरु आहे. योगेश भोईर यांच्यावर ज्ञात मिळकतीच्या 441 टक्के अपसंपदा जमवल्याचा आरोप आहे. नगरसेवक पदाच्या कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक 85, 56, 562 म्हणजेच 449.13 टक्के अपसंपदा संपादित केल्याचा आरोप आहे. योगेश भोईर हे ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक आहेत. तसेच ते मागाठाणेचे उपविभाग प्रममुख आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने खंडणीच्या आरोपांखाली अटक केली होती.