ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना जोरदार धडक अन् कंटनेर नाल्यात पलटी, कुठे झाला भीषण अपघात?

ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना जोरदार धडक अन् कंटनेर नाल्यात पलटी, कुठे झाला भीषण अपघात?

| Updated on: Jul 14, 2024 | 4:04 PM

नवीन कसारा घाटामध्ये धबधबा पॉईंटच्या ठिकाणी हायवे लगत सहा ते सात वाहन थांबले होते. यावेळी मुंबईच्या दिशेने मोठ्या लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यामुळे आणि घाटात धुके असल्याने वाहनाचा अंदाज न आल्याने सहा ते सात वाहनांना धडक दिली आहे. यामध्येय जवळपास तीन ते चार जण गंभीर जखमी झाले तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले.

नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनर गाडीने सहा ते सात वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून धडक दिल्यानंतर कंटेनर हा महामार्गालगत असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाला असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावर महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका आणि जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका रवाना झाली आहे. तर आज विकेंड असल्यामुळे कसारा घाटामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणत गर्दी झाली असून त्यातही हा अपघात झाल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

Published on: Jul 14, 2024 04:04 PM