कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात, ८ जण जागीच ठार, २ लहान मुलांचाही समावेश
कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या ८ जणांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. ट्रक, टेम्पो आणि रिक्षा यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे.
पुणे, १८ डिसेंबर २०२३ : कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या ८ जणांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. ट्रक, टेम्पो आणि रिक्षा यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षामधील ४ जण आणि टेम्पोमधील चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. रिक्षा चालकाची ओळख पटली असून इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. टेम्पोमधील मृत झालेले प्रवासी हे जुन्नरमधील मढ पारगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. अपघातातील टेम्पो ओतूरवरुन कल्याणकडे जात होता. तर रिक्षा आणि ट्रक ओतूरकडे येत होते. अपघातात गणेश मस्करे, कोमल मस्करे, हर्षद मस्करे, काव्या मस्करे, नरेश दिवटे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर तीन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. रिक्षा चालक नरेश दिवटे याची ओळख पटली आहे.