VIDEO : Uttar Pradesh | उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघात
यमुना एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रेटर नोएडाच्या जेवार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या यमुना एक्सप्रेस वेवर आग्र्याहून नोएडाला जात असताना जेवर टोल प्लाझाच्या 40 किमी आधी माईलस्टोनजवळ हा अपघात झाला.
यमुना एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रेटर नोएडाच्या जेवार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या यमुना एक्सप्रेस वेवर आग्र्याहून नोएडाला जात असताना जेवर टोल प्लाझाच्या 40 किमी आधी माईलस्टोनजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या बोलेरो कारचे नियंत्रण सुटले आणि पुढे जाणाऱ्या डंपरला ती धडकली. यामध्ये पुणे-कर्नाटकाहून प्रवास करणाऱ्या कुटुंबातील पाच जणांचे निधन झाले. पहाटे पाच वाजता झालेल्या या भीषण अपघातात कारमधील सात जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच जेवर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
Published on: May 12, 2022 12:20 PM
Latest Videos