Congress च्या बैलगाडी आंदोलनावेळी दुर्घटना; बैलांना दुखापत, गाडीचंही नुकसान, मालकाची माहिती

| Updated on: Jul 11, 2021 | 6:31 PM

काँग्रेसकडून फक्त त्याला हजार रुपये दिवसभराचे भाड मिळालं. काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी त्याबद्दल मागणी केली पण अद्याप कोणत्याही पद्धतीची मदत मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितल आहे.

मुंबई : काँग्रेसच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात असलेल्या आंदोलनात बैलगाडीतून  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते कोसळले. या दुर्घटनेमध्ये बैलगाडीचे नुकसान झाले आणि बैलांनाही दुखापत झालीय. बैलगाडीच्या मालकांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे मागणी केली की माझ्या बैलांना दुखापत झाली आहे, गाडीचे नुकसान झाले, त्याचे पाच ते सहा हजार द्यावे पण काँग्रेसकडून फक्त त्याला हजार रुपये दिवसभराचे भाड मिळालं. काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी त्याबद्दल मागणी केली पण अद्याप कोणत्याही पद्धतीची मदत मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितल आहे.