ठाकरे-शिंदेंच्या 53 आमदारांचा विधानसभेतील कौल काय? कुणाचे किती आमदार येणार? किती जणांचं भविष्य धोक्यात?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार विधानसभा निवडणुकीचा कौल जर पाहिला तर ठाकरेंच्या जागा अधिक येताना दिसून येताय. लोकसभा निवडणुकीत १३ ठिकाणी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रंगला. लोकसभेच्या निकालानुसार, दोन्ही शिवेसनेच्या ५३ आमदारांचा विधानसभेतील कौल पाहिला तर...
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर नेमकं काय होतं याकडे साऱ्यांच्या नजरा होता. फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची पहिली परीक्षा ही लोकसभा निवडणुकीत झाली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनतेने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच पसंती दिली. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार विधानसभा निवडणुकीचा पोल देखील समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नजर विधानसभा निवडणुकीकडे आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार विधानसभा निवडणुकीचा कौल जर पाहिला तर ठाकरेंच्या जागा अधिक येताना दिसून येताय. लोकसभा निवडणुकीत १३ ठिकाणी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रंगला. लोकसभेच्या निकालानुसार, दोन्ही शिवेसनेच्या ५३ आमदारांचा विधानसभेतील कौल पाहिला तर शिंदेंच्या शिवसेनेचे २३ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे ३० आमदार पुढे आहेत. याचाच अर्थ शिंदेंकडे असणाऱ्या ४० आमदारांपैकी १७ आमदारांचं भवितव्य धोक्यात आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…