Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit Poll Results 2024 Maharashtra : राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाचं पारडं जड?

Exit Poll Results 2024 Maharashtra : राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाचं पारडं जड?

| Updated on: Nov 20, 2024 | 8:07 PM

महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान पार पडलं. आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलमध्ये राज्यात कुणाचं सरकार स्थापन होईल? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात आले आहे. या सर्व एक्झिट पोलमध्ये महायुतीचं सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. राज्यातील मतदान करणाऱ्या मतदारांचा आकडा हा अनेक ठिकाणी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत होता. महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान पार पडलं. आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलमध्ये राज्यात कुणाचं सरकार स्थापन होईल? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात आले आहे. या सर्व एक्झिट पोलमध्ये महायुतीचं सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता आहे. पी-मार्क आणि लोकशाही रुद्रच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात काँटे की टक्कर आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात चुरस असण्याची शक्यता आहे. पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला १३७ ते १५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळण्याची शक्यता आहे. यासह पी-मार्कच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात टफ फाईट आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनंतर इतरांना २ ते ८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 20, 2024 08:06 PM