Special Report | शिंदे गटासाठी भाजप किती जागा सोडणार ?
फॉर्मुल्यातील थर्टी म्हणजे, गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 30 जागा. या 30 जागांवर भाजप अधिक फोकस करेल आणि फॉर्म्युल्यातील फोर्टी म्हणजे, 40 जागांवर स्वबळावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणार.
मुंबई : शेवटची निवडणूक समजून लढा, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. त्यामुळं मुंबई महापालिकेसाठी भाजप किती ताकदीनं उतरणार आहे, हे स्पष्ट होतंय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मिशन 150ची घोषणा केलीय. त्यासाठी फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. 150 चा आकडा पार करण्यासाठी 82+30+40 चा फॉर्म्युला असेल असं कळतंय. 2017 ला जिंकलेल्या 82 जागा पुन्हा जिंकण्याला पहिलं प्राधान्य असेल, म्हणजे सर्व 82 नगरसेवकांना पुन्हा तिकीट मिळेल. फॉर्मुल्यातील थर्टी म्हणजे, गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 30 जागा. या 30 जागांवर भाजप अधिक फोकस करेल आणि फॉर्म्युल्यातील फोर्टी म्हणजे, 40 जागांवर स्वबळावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणार. म्हणजेच मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार याचे हे संकेत आहेत