भाजपने दिलेल्या स्क्रिप्टनुसार राजकीय षडयंत्रातून ईडीची कारवाई सुरू- प्रियांका चतुर्वेदी
संजय राऊत यांच्याविरोधात ईडीकडून झालेल्या कारवाईबाबत प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
“राजकीय षडयंत्रानुसार, भाजपने दिलेल्या स्क्रीप्टनुसार ईडी करत असलेली कारवाई ही अत्यंत निंदनीय आहे. मी त्यांना आता इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट नाही म्हणणार तर, एक्सटेंडेट डिपार्टमेंट ऑफ भाजप असं म्हणेन. या कारवाईत कोणतंही तथ्य नाही आणि सत्य नाही. त्यांना अटक करण्यासाठी ईडीकडून काहीही कारण दिलं जात आहे,” अशा शब्दांत प्रियांका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांच्याविरोधात ईडीकडून झालेल्या कारवाईबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
Latest Videos