आरक्षणावरुन अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार आमने-सामने, बघा काय केले अरोप?
tv9 Special Report | ओबीसी प्रमाणपत्रावरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटातील अंबादास दानवे यांच्यात यांच्या आरोप प्रत्यारोप, 'दानवे हे मराठा असून त्यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. तर आरोप सिद्ध करून दाखवावे, असे दानवेचे आव्हान'
मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांनी विविध ठिकाणी दौरा सुरू केला आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी प्रमाणपत्रावरून दोन्ही विरोधी पक्षनेते आमने-सामने आलेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटातील अंबादास दानवे यांच्यात ओबीसी प्रमाणपत्रावरून वार पलटवार सुरू झालाय. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आपलं काम करेल पण मराठा आरक्षण समजावून सांगण्यासाठी मनोज जरांगे यांनी आपला दौरा सुरू केलाय, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मनोज जरांगे यांची आहे. मात्र याच मुद्द्यावरून दोन्ही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार आमने-सामने आलेत. अंबादास दानवे हे मराठा असून त्यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र नसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर वडेट्टीवार यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान अंबादास दानवे यांनी केले. बघा यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट