आरक्षणावरून पुन्हा खडाजंगी, भुजबळांच्या ‘त्या’ आरोपांवर जरांगे पाटील आक्रमक, काय केला पलटवार?
जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील पलटवार केला आहे. छगन भुजबळ यांना व्यक्ती म्हणूनही आता विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटलंय
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात टोकाचा वाद सुरुये. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर जरांगे यांनी देखील पलटवार केला आणि म्हणाले भुजबळ यांना व्यक्ती म्हणूनही आता विरोध असल्याचे त्यांनी म्हटलंय. भुजबळ यांच्या सभेत विजय वडेट्टीवार देखील होते. मात्र भुजबळांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी स्वतःला आणि काँग्रेसला दूर ठेवलंय. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यला विरोध असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आणि त्यांना समर्थन दिले नाही. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. भुजबळ जातीय द्वेष पसरवताय. त्यांचं भाषण म्हणजे महाराष्ट्र जाळण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
Published on: Nov 21, 2023 10:51 AM
Latest Videos