संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यात पुन्हा जुंपली, बघा काय केले आरोप-प्रत्यारोप

संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यात पुन्हा जुंपली, बघा काय केले आरोप-प्रत्यारोप

| Updated on: Jun 09, 2023 | 8:03 AM

VIDEO | शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यात पुन्हा वार-पलटवार

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना आमदार संजय शिरसाट आणि एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यात औरंगजेबच्या कबरीवरून आरोप प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले आहे. औरंगजेबची कबर हैदराबादला न्या असं मीच बोललो होतो, असे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. तर यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कबर कशी नेऊ शकतात, हे त्यांनी समजावून सांगावं, संजय शिरसाट यांचं शिक्षण कमी झालं आहे, त्यामुळे त्यांना वाचता येत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. इतकच नाही तर कबरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सरकारचं संरक्षण असल्याचे म्हटलं आहे.

Published on: Jun 09, 2023 08:02 AM