ठाकरे-फडणवीस यांच्यात घमासान, ‘कुठलीतरी खोली’च्या विधानाचा वाद नालायकपर्यंत
मुख्यमंत्रीपदाच्या वायद्यावरून २०१९ ला काय झालं होतं. यावरून पुन्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाक् युद्ध रंगलंय. फडणवीस यांनी आपण दिल्लीला जाऊन महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार असल्याचे म्हटलं होत. असं ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितल्यावरून हा वाद रंगलाय.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एका शब्दावरून जोरदार घमासान रंगलंय. कुठल्यातरी तरी विधानाचा वाद नालायक शब्दापर्यंत येऊन पोहोचलाय. त्यामुळे दोन्ही बाजून टीका सुरू आहे. याच वादात संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याची चांगलीच चर्चा होतेय. मुख्यमंत्रीपदाच्या वायद्यावरून २०१९ ला काय झालं होतं. यावरून पुन्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाक् युद्ध रंगलंय. फडणवीस यांनी आपण दिल्लीला जाऊन महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार असल्याचे म्हटलं होत. असं ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितल्यावरून हा वाद रंगलाय. ठाकरे-फडणवीसांसह नालायक या शब्दावरून दोन्ही नेत्यांकडून वार-पलटवार सुरू आहे. दरम्यान, दिल्लीत जाऊन फडणवीस यांच्या मनात पंतप्रधान बनण्याची स्वप्न होती, पण मोदींनीच त्यांचे पंख छाटून त्यांना राज्यात उपमुख्यमंत्री केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.