अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर... 'त्या' टीकेवर अमोल कोल्हे यांचा पलटवार

अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर… ‘त्या’ टीकेवर अमोल कोल्हे यांचा पलटवार

| Updated on: Apr 15, 2024 | 4:41 PM

अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या नटसम्राट टीकेवर पलटवार केला आहे. तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती. अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतला परफॉर्मन्स बघावा, असे कोल्हे म्हणाले.

अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतला परफॉर्मन्स बघावा. मग अजित दादांना कळेल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या नटसम्राट टीकेवर पलटवार केला आहे. अमोल कोल्हे दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील काळूस गावात आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार फार मोठे नेते आहेत. मी फक्त एवढचं म्हणेल, मी जे काही केलं ते स्वकर्तृत्वाने केलं. माझे काका नटसम्राट नव्हते, असेही ते म्हणाले तर महायुतीच्या जागा वाटपावरूनही अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला. महायुतीला अजूनही उमेदवार आयात करावे लागतात. काही उमेदवार तर भाजपचे तिकीट परत करतायत. महायुती अजूनही बॅकफूटवर असून महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा दावाही अमोल कोल्हे यांनी केला. दरम्यान, तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती.

Published on: Apr 15, 2024 04:41 PM