मुंबईत बॉम्ब ब्लास्टची धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात, बीकेसी पोलिसांकडून अटक
VIDEO | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुंबईसह दादरमध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट घडवण्याची धमकी, बॉम्ब ब्लास्ट धमकीप्रकरणी बीकेसी पोलिसांकडून आरोपीला बेड्या, अज्ञात व्यक्तीने काय दिली होती धमकी?
मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | मुंबईत बॉम्ब ब्लास्टची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आले आहे. १५ ऑगस्टरोजी दादर परिसरात बॉम्ब ब्लास्ट करणार अशी धमकी या आरोपीने मुंबई पोलीस कंट्रोल रूमला दिली होती. या धमकी प्रकरणी बीकेसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दादरमध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याच्या एका निनावी कॉलने मुंबईत खळबळ उडाली होती. मुंबई सायबर हेल्पलईनवर अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांकडून दक्षता घेण्यात आली त्यानतंर याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीकेसी येथे असलेल्या मुंबई सायबर हेल्पलाईन क्रमांकावर शनिवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून ‘१५ अगस्त के दिन दादर मे सिरीयल ब्लास्ट होगा’ अशी माहिती दिली, पोलिसांनी त्याचे नाव आणि पत्ता जाणण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन कट केला होता. या प्रकरणात ही मोठी अपडेट समोर आली आहे.