जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी चेतन सिंगला काय शिक्षा?
VIDEO | दहिसर ते मीरा रोड दरम्यान जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसवर गोळीबार झालेल्या प्रकरणात अपडेट
मुंबई, ७ ऑगस्ट, २०२३ | जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये चार प्रवाशांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणाऱ्या चेतन सिंह याला पोलिसांनी अटक केली आहे. पण आजाराचा बहाणा सांगून तो पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणात एक अपडेट माहिती समोर येत आहे. जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंगला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बोरिवली न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान कोठडी सुनावली. 31 जुलै रोजी सोमवारी पहाटे 5 ते सव्वा पाचच्या सुमारास जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये चेतन सिंह याने त्याचे वरिष्ठ अधिकारी टीकाराम यांच्यावर गोळीबार केला होता. दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्याने हा गोळीबार केला होता. त्यात टीकाराम यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने पॅसेंजरमधून उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला अटक केली होती.