चूक केली... पुणे कार अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची आपल्या मुलाबद्दल पोलिसांसमोर कबुली

चूक केली… पुणे कार अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची आपल्या मुलाबद्दल पोलिसांसमोर कबुली

| Updated on: May 23, 2024 | 2:41 PM

वेदांतने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकवरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणानंतर वेदांतला अटक करण्यात आली तर घडलेला प्रकार माहित होताच फरार झालेल्या वेदांतचे वडील अर्थात विशाल अग्रवालला मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक झाली

विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकवरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणानंतर वेदांतला अटक करण्यात आली तर घडलेला प्रकार माहित होताच फरार झालेल्या वेदांतचे वडील अर्थात विशाल अग्रवालला मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली अशी कबुली विशाल अग्रवाल याने पोलिसांसमोर दिली आहे. दरम्यान, पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या २४ मे पर्यंत विशाल अग्रवाल, जितेश शेवनी, जयेश बोनकर याला तीन दिवस कोठडी सुनावली. तर पोलिसांच्या चौकशी दरम्यान विशाल अग्रवालने कबुली देताना अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केल्याचं म्हटलं आणि झालेल्या प्रकाराबाबत विशाल अग्रवाल याने खंतही व्यक्त केली.

Published on: May 23, 2024 02:41 PM