Saif Ali Attack : सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या ‘या’ भागात पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

Saif Ali Attack : सैफवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या ‘या’ भागात पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

| Updated on: Jan 16, 2025 | 4:30 PM

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मुंबईतील प्रभादेवीमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. हल्ला करणारा हा अज्ञात व्यक्ती सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो घरात थेट कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता की त्याचा काही वेगळा हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात शिरणाऱ्या चोराचं लोकेशन सापडल्याची माहिती समोर आली आहे. शिड्यांवरून सैफच्या घरात प्रवेश करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मुंबईतील प्रभादेवीमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. हल्ला करणारा हा अज्ञात व्यक्ती सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो घरात थेट कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता की त्याचा काही वेगळा हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, याप्रकरणात पोलिसांकडून शोध सुरू आहे. सैफवर काल मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला. सैफवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसली होती. या व्यक्तीचा रात्री दोन वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्याशी वाद झाला. याचा आवाज सैफला आला आणि हा आवाज ऐकून सैफ त्याच्या रुमबाहेर आला, तेव्हा चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला. अज्ञात व्यक्तीकडून सैफवर चाकूने सहा वार करण्यात आले. या हल्ल्यात सैफच्या मणक्याला जबर दुखापत झाली आणि त्याला लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सैफची प्रकृती स्थिर आहे.

Published on: Jan 16, 2025 04:30 PM