रवींद्र वायकर सत्तेच्या दारी, आरोपांची मालिका करणाऱ्या सोमय्या यांचा अभ्यास निकामी?

रवींद्र वायकर सत्तेच्या दारी, आरोपांची मालिका करणाऱ्या सोमय्या यांचा अभ्यास निकामी?

| Updated on: Mar 12, 2024 | 12:05 PM

ठाकरे गटात असलेले रवींद्र वायकर यांच्यावर आरोपांची मालिका करणारे किरीट सोमय्या यांनी वायकरांच्या प्रवेशानंतर मौन राहणं पसंत केले आहे. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी घोटळा केला की नाही, यावर ते आता गप्प आहे. वायकरांवर बोलण्याऐवजी सोमय्या आता ठाकरेंवर बोलताय.

मुंबई, १२ मार्च २०२४ : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आणखी एक नेते सत्तेत गेलेत. ठाकरे गटात असलेले रवींद्र वायकर यांच्यावर आरोपांची मालिका करणारे किरीट सोमय्या यांनी वायकरांच्या प्रवेशानंतर मौन राहणं पसंत केले आहे. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी घोटळा केला की नाही, यावर ते आता गप्प आहे. तर रवींद्र वायकर यांच्यावर बोलण्याऐवजी सोमय्या आता उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताय. याआधी आरोपांची प्रकरणं कोर्टात होती. मात्र आता केस कोर्टात आहे असं म्हणत सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावरील कथित घोटाळ्यावर बोलणं टाळलं. दरम्यान, सोमय्या म्हणतात पक्ष बदलले असले तरी कारवाई थांबणार नाही. मात्र रवींद्र वायकर हे शिंदेच्या शिवसेनेत येण्याच्या १५ दिवस आधीच मुंबई पालिकेने त्यांना मोठा दिलासा दिलाय. जोगेश्वरीतील एका जमिनीवर वायकर यांनी हॉटेल बांधल्याचा आरोपा होता. यासंदर्भातच किरीट सोमय्यांनी मुंबई पालिकेत तक्रार केली. तक्रारीनंतर ईडी EOW कडून त्यांची चौकशी लागली. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 12, 2024 12:05 PM