Sanjay Shirsat : ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली त्याच्यावर कारवाई, संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल

Sanjay Shirsat : ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली त्याच्यावर कारवाई, संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल

| Updated on: Jul 31, 2022 | 9:46 AM

'ज्यांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्यांच्यावर जर कारवाई होत असेल तर शिवसैनिकांना आनंदच झाला असेल असे म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टिका केली आहे. 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईमुळे पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी (ED) ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. असे असताना शिवसैनिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे शिंदे गटात सहभागी झालेले आमदार मात्र, जे झाले ते योग्यच असल्याचे सांगत आहेत.  ज्यांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्यांच्यावर जर कारवाई होत असेल तर शिवसैनिकांना आनंदच झाला असेल असे म्हणत (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांनी राऊतांवर टिका केली आहे. शिवाय ते शिवसेनेत असले काय आणि नसले काय त्यामुळे काही फरक पडणार नाहीत. त्यांची वाणी, लेखणी ही चांगली आहे. पण तो काय मास लिडरही नाही असाही हल्लाबोल शिरसाठ यांनी केला आहे.

Published on: Jul 31, 2022 09:45 AM