आगे आगे देखो होता है क्या

आगे आगे देखो होता है क्या

| Updated on: Mar 23, 2022 | 12:30 AM

श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून आप्तांच्याच फक्त तिजोऱ्या भरण्याचे काम सुरु असल्याची टीका नारायण राणे यांनी केली. रश्मी ठाकरे यांच्या भावावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर या आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. ठाकरे घराण्याचा फक्त फायदा झाला आहे, शिवसेनेचे कार्यकर्त्यांना काहीच मिळाले नसल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती या सरकारमुळे आल्याची टीकाही त्यांनी केली.