वाल्मिक कराडवर मकोका, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला? Mcoca Act म्हणजे नेमकं काय?

वाल्मिक कराडवर मकोका, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला? Mcoca Act म्हणजे नेमकं काय?

| Updated on: Jan 14, 2025 | 5:12 PM

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर आज मोठी कारवाई करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर आज मोठी कारवाई करण्यात आली. वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पण मकोका म्हणजे काय? तुम्हाला माहितीये का?

Mcoca Act म्हणजे नेमकं काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाईज्ड क्राईम अॅक्ट म्हणजेच मकोका… संघटित गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी १९९९ मध्ये हा कायदा आणण्यात आला. ‘टाडा’च्या धर्तीवर मकोका कायदा तयार करण्यात आला. परवानगीचा अर्ज मकोका कायदा कलम २३ (१) नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील १० वर्षांच्या गुन्ह्याचा तपशील दिला जातो. तर अहवालाचा अभ्यास करून मकोका लावल्यास पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते. सदर परवानगी मिळाल्यानंतरच मकोकांतर्गत कारवाई केली जाते. अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारने हा कायदा आणला होता. तर संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा असल्याने लवकर जामीन मिळत नाही.

Published on: Jan 14, 2025 05:12 PM