MLA Residence Mumbai : साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
Activist Found Dead In MLA Residence : मुंबईच्या आकाशवाणी येथे असलेल्या आमदार निवासात एका कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासमध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. आकाशवाणी इथल्या खोली क्रमांक 408मध्ये हा कार्यकर्ता राहात होता. या कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार खोली नंबर 408 ही आमदार विजयकुमार देशमुख यांची खोली आहे. त्याच खोलीत सोलापूरची एक व्यक्ती काही दिवसांपासून राहात होती. मात्र त्याला रात्री हृदयविकाराचा झटका आला. यावेळी वारंवार रुग्णवाहिकेला फोन देखील करण्यात आले, मात्र रुग्णवाहिका वेळेवर आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना या घटनेची माहिती द्यावी लागली. त्यानंतर पोलिसांच्या गाडीमधूनच या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. आकाशवाणीच्या आमदार निवासात आमदार फारसे राहात नसले तरी ग्रामीण भागातून आलेले त्यांचे बरेच कार्यकर्ते याठिकाणी राहतात.

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?

पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
