‘नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याऐवजी…’, अभिनेता आमिर खान यानं काय केलं वक्तव्य?
VIDEO | नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर आमिर खान माध्यमांशी बोलताना झाला सुन्न, काय दिली भावनिक प्रतिक्रिया?
मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | प्रसिद्ध कालादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे कला विश्वात एकच खळबळ माजली आहे. आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असं आता तपासातून समोर येत आहे. बुधवारी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आमिर खान कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्यानं नितीन देसाई यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर माध्यमांशी भावनिक संवाद साधला. ‘नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याऐवजी मदतीसाठी विचारणा करायला हवी होती’, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेता अमिर खानने व्यक्त केली आहे. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर आमिर खानने ही प्रतिक्रिया देताना नितीन यांच्या दुर्दैवी निधनाने धक्का बसल्याचेही म्हटले आहे.