शिवपुत्र संभाजी महानाट्यादरम्यान अमोल कोल्हे यांचे पोलिसांवरचं थेट आरोप, नेमकं काय घडलं?
VIDEO | पुण्यात पोलिसांकडून अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी महानाट्य बंद पाडण्याचा प्रयत्न, पण का?
पुणे : प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग काल पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आला. पण या प्रयोगादरम्यान एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी महानाट्य सुरु असताना अचानक पोलिसांकडून ते बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी भर मंचावरुन पोलिसांवर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. शिवपुत्र संभाजी नाटकाचे पास दिले नाही तर याचे सादरीकरण कसे होते, हे बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला. या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील उल्लेख करत त्यांना धमकी देणाऱ्या पोलिसांना समज देण्याचं आवाहन फडणवीस यांना केले आहे. आता अमोल कोल्हे यांच्या या आरोपांवरुन आता पोलिसांकडून काय भूमिका मांडण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.