Special Report | नानांना दादांच्या कामाची भुरळ, पण 'तो' जुना video Viral -TV9

Special Report | नानांना दादांच्या कामाची भुरळ, पण ‘तो’ जुना video Viral -TV9

| Updated on: Jan 22, 2022 | 10:26 PM

अजित पवार हा माणूस जितके काम करतो,  त्याची जाहिरात कधी करत नाही. इमानाने गपचूप काम करत राहतो. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित माध्यमांकडून केली जाते. मात्र त्यांनी केलेलं काम समोर आणा असे नाना पाटेकर म्हणाले आहेत.

पुणे – अजित पवार हा माणूस जितके काम करतो,  त्याची जाहिरात कधी करत नाही. इमानाने गपचूप काम करत राहतो. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित माध्यमांकडून केली जाते. मात्र त्यांनी केलेलं काम समोर आणा असे नाना पाटेकर म्हणाले आहेत. इतकंच नव्हेत तर तो फार चांगला पुढारी आहे. सरकारने केलेल्या कामाना जेवढी प्रसिद्धी मिळत नाही. याउलट आम्ही अगदी छोटंसं काम केलं तरी खूप प्रसिद्धी मिळते. त्यांनी केलेलं काम समोर आणा, तो खरंच चांगला नेता आहे. असं मत व्यक्त करत अभिनेते नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याचे कौतुक केलं आहे. विरोधपक्षातील लोक ही आपणच निवडून दिले आहे. तीही माणसे पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. मग कोणीही पक्ष बदलणार नाही.काहीतरी नियम असायला हवेत. किमान शिक्षणाची अट हवी असे मतही त्यांनी व्यक्त केली आहे.