R Madhavan FTII | सुपरस्टार आर. माधवन एफटीआयआयचे नवे अध्यक्ष
VIDEO | सुपरस्टार आर. माधवन याच्या गळ्यात एफटीआयआय अध्यक्षपदाची माळ, केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. अनुराग ठाकुर यांनी काय केलं ट्वीट ?
मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | फिल्म अँड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सुपरस्टार आर. माधवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता फिल्म अँड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची नवी जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली आहे. “आर माधवन यांना एफटीआयआय आणि गव्हर्निंग काऊंसिलचे अध्यक्ष झाल्याप्रकरणी हार्दिक शुभेच्छा. मला विश्वास आहे की तुमचा दीर्घ अनुभव आणि नैतिकता या संस्थेला समृद्ध करेल. सकारात्मक बदल होतील आणि उच्च स्तरावर लौकीक पोहोचेल. माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.” असे म्हणत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्वीट करत सुपरस्टार आर. माधवनला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनुराग ठाकुर यांच्या ट्वीटनंतर अभिनेता आर. माधवन यानेही रिप्लाय देत त्यांचे आभार मानले आहे.