अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, वडील सलीम खान यांना मिळालं पत्र

| Updated on: Jun 06, 2022 | 10:49 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान काल मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांना एक पत्र सापडलं त्या पत्रात सलमान खान यांचा सुद्धा मुसेवाला होणार अस धमकीवजा मजकूर लिहिण्यात आलेला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान काल मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांना एक पत्र सापडलं त्या पत्रात सलमान खान यांचा सुद्धा मुसेवाला होणार अस धमकीवजा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. या संदर्भात काल वांद्रे पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे. यापूर्वीसुद्धा अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. अभिनेता सलमान खान यांच्यावर काळ्या हरणाची शिकार केल्या संदर्भातची केस सुरू आहे. त्याच संदर्भात लॉरेन्स बिष्णोई या गुन्हेगाराने सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आत्ता जे धमकीवजा पत्र सलमान खान यांच्या वडील सलीम खान यांना मिळालेलं आहे. यावर गुन्हा सुद्धा नोंद झाला आहे त्यामुळे मुंबई पोलीस सलमान खान यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

Published on: Jun 06, 2022 10:49 AM
शिवप्रेमींना गडावर जाण्यासाठी रोप वेची सुविधा
‘आज नाहीतर उद्या अनिल देशमुख,मलिकांना न्याय मिळेल’