सयाजी शिंदे थेट अंतरवाली सराटीत अन् घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, काय झाली दोघांत चर्चा?
बुधवारी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे स्पष्ट म्हटले. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन केलं यासाठी शुभेच्छा देण्यास आल्याचे त्यांनी म्हटले
जालना, ३ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे थेट आता मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. येत्या २० जानेवारीला मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह मुंबईत येणार असून ते आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अशातच बुधवारी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे स्पष्ट म्हटले. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन केलं यासाठी शुभेच्छा देण्यास आल्याचे त्यांनी म्हटले. आमच्यात अशी कोणती चर्चा झाली नाही. मी फक्त आलो, चहापाणी घेतलं मी काही अभ्यासक नसल्याचेही सयाजी शिंदे यांनी म्हटले. तर मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज मनोज जरांगे पाटील यांनी उठवला त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो. रस्त्यावर उतरून नाही पण आमचा सपोर्ट असणार आहे, असेही सयाजी शिंदे यांनी आवर्जून यावेळी म्हटले.