Sonu Sood | अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत वाढ
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) रोज कोणत्या ना कोणत्या संकटात अडकत आहे. आता बृहमुंबई महानगरपालिकेने (BMC) सोनूला नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्याला हॉटेलमध्ये रुपांतरीत केलेल्या सहा मजली इमारतीचे पुन्हा निवासी इमारतीत रूपांतर करण्यास सांगितले आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) रोज कोणत्या ना कोणत्या संकटात अडकत आहे. आता बृहमुंबई महानगरपालिकेने (BMC) सोनूला नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्याला हॉटेलमध्ये रुपांतरीत केलेल्या सहा मजली इमारतीचे पुन्हा निवासी इमारतीत रूपांतर करण्यास सांगितले आहे. सोनूला ही नोटीस 15 नोव्हेंबरला बजावण्यात आली होती. या इमारतीला हॉटेल बनवताना करण्यात आलेले बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोनूला बीएमसीने सरत्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या जुहू हॉटेलचे निवासी इमारतीत रूपांतर करून बेकायदा बांधकाम हटवण्यास सांगितले होते. सोनूने मुंबई हायकोर्टात सांगितले होते की, मी बीएमसीच्या नियमांचे पालन करतो आणि स्वत: या इमारतीचे नूतनीकरण करून घेणार आहे.
Latest Videos