दिपाली सय्यद यांनी शिंदे गट पक्ष प्रवेशावर मौन सोडलं; म्हणाल्या, ‘मला गरज नाही’
त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली होती. तर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याने पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र घोषणा केल्यापासून आता जवळ जवळ 6 महिने ओलंडून जात आहेत.
ठाणे : अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी शिंदे गट निर्माण झाल्यावर ठाकरे गटासह उद्धव ठाकरे यांना धक्का दिला होता. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली होती. तर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याने पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र घोषणा केल्यापासून आता जवळ जवळ 6 महिने ओलंडून जात आहेत. मात्र त्यांचा पक्ष प्रवेश झालेला नाही. यावरूनही अनेक चर्चांना उधान आलं आहे. यावरून दिपाली सय्यद यांना छेडलं असता त्यांनी, थेट दोनच शब्दात उत्तर दिलं. त्यांनी या आधीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता पुन्हा पक्ष प्रवेशाची गरज काय असा सवाल केला.
Published on: Jun 04, 2023 10:07 AM
Latest Videos